Saturday, January 25, 2014

पाऊस



आले झर झर ढग, गेले झाकुनिया नभा,
होई गहजब येथे, थाटे सोहळा हा नवा ||

गहिवरले हे मन, पान्हा वात्सल्याचा पहा,
आला आला आला आला, मऊ ओलासा गारवा ||

नभ काळे नि जांभळे, नभी पारव्यांचा थवा,
लेउनी हा धरित्रीचा, गोड प्रेमाचा सांगावा ||

दुडू दुडू त्याची चाल, जणु खट्याळ नाखवा,
आला वल्हवीत नाव, संगे घेऊन ओलावा ||

आणि भेट त्यांची होता, पृथ्वी आनंदाने गाई,
धुंद करीत मनाला, जणु बाळाला अंगाई ||

-    -देवेंद्र

No comments:

Post a Comment