साद्रतेच्या पंखावरूनी
अलगद हात फिरवलायस का?
ऋतुपर्णांचा शुद्ध षड्ज
वेड्या कधी तरी टिपलायस का?
इंद्रधनू त्या ऋतुपर्णांचे
तुला कधी तरी भावले का?
मंगलगाणी गिरीजसुतांची
वेड्या कधीतरी ऐकलीस का?
लगबग ही तर असे रोजची
मृण्मय पंक विसरलास का?
धुत वस्त्रा पल्याडचे ते
अधुत धूत हुडकलेस का?
परमानंदाच्या या भेटी
क्षणिक सुखात विसरलास का
जन्म दिला ज्या मातीनी तुज
मृदस्पर्ष तो विसरलास का
ऋणानुबंधाची ही गीते
सुरचं जरा विसरलास का?
षड्ज असे तो अनंतरुपी
सम प्राप्तीतच गुंतलास का?